Baramati Loksabha । बारामतीत हाय व्होल्टेज लढत वेगळ्या वळणावर? दोन्ही पवार एकाच गाडीवर

Baramati Loksabha

Baramati Loksabha । बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election 2024 । “अमरावतीत कधीही हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते”, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकाच गाडीवर पाहायला मिळाले आहेत. हिंजवडीच्या बगाड यात्रेच्या गाडीवर पार्थ पवार आणि रोहित पवारांनी एकमेकांना सांभाळून घेत हास्यवदन केलं. जरी या दोघांमध्ये फारसा संवाद झाला नसला तरी पवार कुटुंबातले दोघं एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, म्हणाले; “फडणवीसांना अटक होण्याची भीती असल्याने…”

“आगामी निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. पवार साहेबांचं वय काढणारे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे. वस्तादाने तयार केलेल्या पैलवानाला वाटतं की आपण एकट्याने तयार झालो आहोत. पण शेवटी वस्ताद एक डाव राखून ठेवतो आणि डाव जिंकतो,” असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

Lok Sabha Election । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची होणार घरवापसी

Spread the love