Maharashtra Politics । ऐन निवडणूक काळात (Loksabha election) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूप मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
नुकतीच ठाकरे गटाने आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र हा बडा नेता कोण याबाबत अजून कोणीतही माहिती समोर आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या नेत्याचा आज सकाळी 10. 30 वाजता भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे.
Ajit Pawar । लोकसभेपूर्वी वाढलं अजितदादांचं टेन्शन! पक्षातील बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
संपूर्ण देशात निवडणुकीचं वारे वाहत असताना निवडणुकीपूर्वी हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याचा उद्धव ठाकरेंना आगामी निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसू शकतो. जरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी अनेक नेते तिकीट नाकारल्याने नाराज असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.
Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार करणार एक दोन दिवसांत साताऱ्यातील उमेदवाराबाबत घोषणा