Sanjay Shirsat । ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शरद पवारांनी लावलं भांडण, शिंदे गटाच्या बड्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat । लोकसभेच्या (Loksabha election) तोंडावर मागील काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. लोकसभेच्या जागावाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु आहेत. अनेक नेतेमंडळी तिकीट नाकारल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. अशातच शिंदे गटाच्या बड्या आमदाराने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप केले आहेत. (Latest marathi news)

Topers Ad

Ajit Pawar । लोकसभेपूर्वी वाढलं अजितदादांचं टेन्शन! पक्षातील बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षामध्ये भांडण लावलं असून शरद पवारांच्या खेळीत ठाकरे गट अडकला आहे”, असा घणाघात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Sanjay Shirsat vs Sharad Pawar)

Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार करणार एक दोन दिवसांत साताऱ्यातील उमेदवाराबाबत घोषणा

“ज्या सांगलीमध्ये ठाकरे गटाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा निर्माण होईल. मुळात हा तिढा निर्माण व्हावा यासाठी शरद पवारांनी ही खेळी ठरवून केली आहे. ठाकरे गटाचं सांगलीवर कसलंही प्रेम नाही. ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली आहे, तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही ठाकरे गटाचा कार्यकर्ता नाही,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

Politics News । राजकारणात खळबळ, काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची सून करणार भाजपमध्ये प्रवेश

Spread the love