Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटाचे उमेदवार अखेर ठरले? शनिवारी यादी येणार समोर?

Sharad Pawar

Sharad Pawar । महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र अद्याप शरद पवार गटाने त्यांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता आज करणार भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार यांच्या गटाला जागावाटपामध्ये अहमदनगर, रावेर, बारामती, दिंडोरी, शिरूर, सातारा, बीड, वर्धा आणि माढा हे मतदारसंघ मिळाले आहे. यामध्ये शिरूरमधून खासदार अमोल कोल्हे तर बारामतीतुन खासदार सुप्रिया सुळे यांना उमेवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, अन्य उमेदवार कोण असणार? याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. आता याची यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे.

Sanjay Shirsat । ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शरद पवारांनी लावलं भांडण, शिंदे गटाच्या बड्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याबाबत घोषणा करतील. शनिवारी दुपारी म्हणजेच आज चार वाजता पत्रकार परिषद घेत जयंत पाटील याबाबत माहिती देतील. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे आपल्या समर्थकांसह पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात परतले आहेत. त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar । लोकसभेपूर्वी वाढलं अजितदादांचं टेन्शन! पक्षातील बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

Spread the love