Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी पत्रकारांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आशिष शेलार यांनी आचारसंहितेच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेतला आहे.

Ravi Rana । ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंबाबत धक्कादायक दावा; म्हणाले…

20 मे रोजी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले होते. या दिवशी राज्यातील 13 जागांवर मतदान झाले, ज्यात मुंबईच्या सहाही लोकसभेच्या जागांचा समावेश होता. याबाबत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Salman Khan । सलमान खानवर हल्ल्याचा कट रचणारा पाचवा आरोपी हरियाणातून अटक; धक्कादायक खुलासा


मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. ज्या ठिकाणी ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीला जास्त मतं मिळू शकतील, त्या ठिकाणी निवडणूक आयोग मतदानासाठी जाणीवपूर्वक जास्त वेळ देत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला होता. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अनेक मतदारांनी कंटाळून मतदान न करण्याचा निर्णय घेतला. याच परिषदेत ठाकरे यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Lok Sabha Chunav 2024 । लोकसभा निवडणुकीचे निकाल सिनेमागृहात दाखवले जाणार, तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या

Spread the love