Sharad Pawar । महाराष्ट्रात उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील अनेक भागातील जनता दुष्काळाने होरपळत असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दुष्काळाचा सामना करण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे की, “दुष्काळामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याअभावी बळीराजा आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चारा टंचाई आहे. अशा परिस्थितीत या भयावह स्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
Salman Khan । सलमान खानवर हल्ल्याचा कट रचणारा पाचवा आरोपी हरियाणातून अटक; धक्कादायक खुलासा
राज्यात अशीच दुष्काळी परिस्थिती कायम राहिली आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच संघर्षाचा मार्ग पत्करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. असे शरद पवारांनी म्हंटले आहे.