Salman Khan । सलमान खानवर हल्ल्याचा कट रचणारा पाचवा आरोपी हरियाणातून अटक; धक्कादायक खुलासा

Salman Khan

Salman Khan । बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय जॉनी वाल्मिकीला हरियाणातील भिवानी येथून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने नवा कट रचला होता. याच प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरियाणा पोलिसांनी ही अटक केली आहे.

Crime News । गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडचे धक्कादायक कृत्य; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हरियाणा पोलिसांनी 37 वर्षीय जॉनी वाल्मिकी नावाच्या आरोपीला भिवानी येथून अटक केली आहे. जॉनी वाल्मिकीला शनिवारी अटक करण्यात आली. लवकरच त्याला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजितदादांना मोठा धक्का बसणार?

एप्रिल महिन्यात ४ आरोपींना अटक करण्यात आली

सलमान खानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून रचला जात होता. नवी मुंबई पोलिसांनी हा कट उधळून लावत एप्रिल महिन्यात चार आरोपींना अटक केली. त्याच्या चौकशीतच जॉनी वाल्मीकीचे नाव पुढे आले. यानंतर ही माहिती नवी मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांना दिली.

Maharashtra Exit Poll । महाराष्ट्रातील एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्यांना मजा करू द्या…’

Spread the love