Udayanraje Bhosale । साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale । भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची १२वी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने साताऱ्यातून उमेदवार जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात आता शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले (Shashikant Shinde vs Udayanraje Bhosale) असा सामना होणार आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता उदयनराजे भोसलेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांनी केला मोठा गेम, आता बारामती लोकसभेसाठी असणार उमेदवार….

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशीसंवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. सर्व जनतेची साथ मिळाली” असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत”

Maharashtra Politics । 84व्या वर्षी शरद पवारांनी पुन्हा फिरवली भाकरी, 3 मतदारसंघांची बदलली समीकरणे

दरम्यान, महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 2024 चे मतदान 7 मे रोजी (टप्पा 3) होणार आहे. या जागेचे निकाल सर्व जागांसह ४ जून रोजी येतील.

Satara Lok Sabha । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी

Spread the love