Maharashtra Politics । 84व्या वर्षी शरद पवारांनी पुन्हा फिरवली भाकरी, 3 मतदारसंघांची बदलली समीकरणे

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे (Loksabha election) चांगलेच वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरात प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलीच तयारीला लागले आहेत. शरद पवारांनी नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह घेत सर्व मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता शरद पवारांनी पुन्हा भाकरी फिरवली आहे.

Satara Lok Sabha । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी

अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यानं पाच वर्षांनंतर शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सुमारे 10 वर्षानंतर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) एकत्र पाहायला मिळाले आहेत. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंञी पदी असताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांकडे आग्रह करून उपमुख्यमंञीपद स्वत:कडे घेतलं. पण अजितदादांनी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली.

Lok Sabha Election । धक्कादायक! पैशांचं आमिष देऊन महिलांना करायला लावला प्रचार पण पुढे घडलं वेगळंच..

धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा शरद पवारांच्या पक्षात माघारी आले आहेत. मोहिते पाटील शरद पवारांसोबत आल्याने आता केवळ माढा नाही तर सोलापूर, सातारा आणि बारामती लोकसभेतही महाविकास आघाडीला राजकीय फायदा होऊ शकतो, असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत. याचा महायुतीला खूप मोठा फटका बसू शकतो.

Sangli Politics । सांगलीत ठाकरे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का

Spread the love