Crime News । यवतमाळ : राज्यात वाळू तस्करीला (Sand smuggling) बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही आज अनेक नदीपात्रातून वाळू तस्करी केली जात आहे. यातून अनेक गुन्हे देखील घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वाळू तस्करांच्या दोन गटात गोळीबार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळू तस्करांच्या दोन गटात पैनगंगा नदीपात्रात (Panganga River) रस्त्याच्या कारणावरून अंदाधुंद गोळीबार झाला. ही घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील भोसा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटाचे उमेदवार अखेर ठरले? शनिवारी यादी येणार समोर?
प्राथमिक माहितीनुसार, वाळू तस्करांच्या दोन गटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कारणावरून हा गोळीबार केला असे बोलले जात आहे. पण या दोन गटात असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रेती तस्करांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू केल्या आहेत. असे असताना रिव्हॉल्व्हर आल्या कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.