Sharad Pawar । … तर आम्ही तुमच्यासोबत राहू, शरद पवारांनी दिली सरकारला खात्री

Sharad Pawar

Sharad Pawar । बारामती : आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने शक्तीप्रदर्शन केलं. (Latest marathi news)

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! बारामतीत शिवसेनेचा बडा नेता देणार अजितदादांना सर्वात मोठा धक्का

उद्याही हा मेळावा सुरु असणार आहे. आज महामेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं असून तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिलं, तर आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी खात्री शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलेल्या ग्वाहीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Police Recruitment । खुशखबर! राज्यात होणार तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती

बोलताना शरद पवार म्हणाले की, “राजकारण एका बाजूला असतं. सरकार रोजगारासाठी पावलं टाकतंय ही चांगली गोष्ट आहे. मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू. एवढी खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार म्हणाले. तसेच शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या विविध संस्थांची माहिती दिली.

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या मंत्र्यावर मारहाणीचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यानेच तक्रार दिल्याने खळबळ

Spread the love