Crime news । नागपूर : सध्या एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. मृत्यू कोणाला? कधी? कुठे? आणि कसा गाठू शकतो? याचा अंदाज लावणे खूप अवघड काम आहे. सध्या अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. मित्रांसोबत खेळताना एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)
Nilesh Lanke । निलेश लंके शरद पवारांसोबत जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…
त्याच्या मृत्यूमागचं कारण आहे ती म्हणजे मांजर. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण होय, हे खरे आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा (Hingana) तालुक्यात ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता 11 वर्षांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळत असताना अचानक त्याच्यावर मांजरीने हल्ला केला. हल्ल्यात तिने त्या मुलाच्या पायाचा चावा घेतला.
Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मांजर चावल्यानंनतर काही वेळाटच त्याला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. या घटनेनंतर त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हिंगणा तालुक्यात शोककळा पसरली आहे.