Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. लवकरच जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो. जागावाटपाबाबत (Loksabha election seats) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. (Latest marathi news)

Pratibha Dhanorkar । पक्षातील विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला; काँग्रेसच्या महिला आमदाराच धक्कादायक वक्तव्य

आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती असून अजित पवार यांनी सातारा प्रिती संगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाट्याला किती जागा येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की,” जागा वाटपाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्षांनी प्राथमिक चर्चा केली. प्रत्येक पक्षाचा मान-सन्मान राखला जाईल,” असे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Cabinet Meeting । सरकारकडून होळीपूर्वी मोठे गिफ्ट; घेतले धडाकेबाज निर्णय

पुढे ते म्हणाले की, “राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल, गढूळपणा येईल अशी वक्तव्य टाळावी, ही माझी भावना आहे. आमचा समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीची बैठक आज किंवा उद्या होऊ शकते,” असेही अजित पवार म्हणाले आहे.

Lok Sabha Election । भाजप हायकमांडने घेतली टोकाची भूमिका! शिंदे गटाच्या ‘या’ सहा खासदारांचा पत्ता होणार कट

Spread the love