Pratibha Dhanorkar । पक्षातील विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला; काँग्रेसच्या महिला आमदाराच धक्कादायक वक्तव्य

Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar । चंद्रपुर : गेल्या वर्षी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झाले. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होते. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. यावर प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देत खळबळजनक आरोप केला आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election । भाजप हायकमांडने घेतली टोकाची भूमिका! शिंदे गटाच्या ‘या’ सहा खासदारांचा पत्ता होणार कट

“माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजप पक्षामध्ये (BJP) जाणार आहेत. पण माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. काँग्रेसच्याच तिकिटावर मी आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवणार आहे, असे प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्या चंद्रपुरमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

CAA । निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केली सर्वात मोठी घोषणा

“खासदार साहेब गेले तेव्हापासून पक्षातील काही लोक माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा त्यांनी जीव घेतला आहे. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला मात्र मी दुसरा जीव जाऊ देणार नाही”, असं प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar । “आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकू शकतात”, कारवाईवरून रोहित पवारांनी व्यक्त केली भीती

Spread the love