आपल्या जवळचं कोणी आपल्याला सोडून गेलं तर ती व्यक्ती परत यावी यासाठी आपला जीव तळमळत असतो. परंतु एकदा जीव गेला तर तो पुन्हा परत येत नाही अशी म्हण आहे. तीच म्हण खोटी ठरवत बिहारमधील (Bihar) मुजफ्फरपुर (MuzaffarPur) जिल्ह्यातील एक तरुण ज्याला मृत म्हणून घोषित केलं होतं. तोच तरूण तब्बल 6 महिन्यांनी घरी परतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याला घरी परत आलेला पाहून त्याच्या कुटुंबाला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच बसला आहे. मोहम्मद एहतम अन्सारी (Mohammed ahhtam Ansari) असं त्या मुलाचं नाव आहे.
मोहम्मदला 16 डिसेंबर 2022 रोजी मोहम्मद एहतम अन्सारीला मोबाईल चोरीच्या आरोपावरून काही तरुणांनी मिळून मारहाण करून त्याला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सर्वांना वाटलं. एवढेच नाही तर मृतदेहाची ओळख पटवताना नातेवाइकांनी मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द केला होता. बिहारच्या (Bihar) मुझफ्फरप जिल्ह्यात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही जेव्हा त्यांचा मुलगा 6 महिन्यांनंतर परतला. नातेवाइकांनी त्याला मृत समजुन दफन केले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला नव्हता.
उत्तर प्रदेशातील तिल्हार येथे 16 डिसेंबर 2022 च्या रात्री अयोध्या-दिल्ली एक्स्प्रेस (Ayodhya-Delhi express) क्रमांक 14205 च्या सर्वसाधारण बोगीत एका महिला प्रवाशाचा फोन चोरीला गेला होता. एहतम अन्सारी हा त्याच्या मित्रासोबत याच ट्रेनमधून प्रवास करत होता. महिलेने गोंधळ केला आणि त्या संशयावरून झडपी घेण्यात आली. एहतमकडून फोन जप्त करण्यात आला. त्यानंतर ट्रेनमध्ये उपस्थित तरुणांनी एहतम आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. यानंतर दोघांना चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आले.
खळबळजनक! शरद पवारांनंतर आता संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी
घरी परतल्यानंतर मोहम्मद एहतम अन्सारीने सांगितले की, ट्रेनमधून फेकल्यानंतर तो जंगलाच्या वाटेवर असलेल्या एका आश्रमात पोहोचला. तेथे साधू-बाबांनी त्यांची काळजी घेतली आणि तो बरा झाल्यावर घरी परतला.