नक्की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे का? शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Is he a worker of BJP? Ajit Pawar raised a question regarding Sharad Pawar threat

“तुझाही दाभोळकरच होईल” अशी ट्विटद्वारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) याप्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत. धमकी देणारा तो व्यक्ती भाजपचा (BJP) कार्यकर्ता आहे असं सांगितलं जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना भेटण्यापेक्षा थेट गृहमंत्र्यांनाच भेटलं पाहिजे असं मत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडल आहे.

रात्रीची वेळ होती तरुणी दोन मित्रांसोबत पडीक इमारतीत पार्टी करायला गेली अन्.. त्या ठिकाणी घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल

“ज्याने कोणी धमकी दिली तो भाजपचाच कार्यकर्ता आहे. असं सांगितलं जातंय. परंतु, तो खरच भाजपचा कार्यकर्ता आहे का? हे पाहण गरजेचं आहे. त्याला पक्षातील लोकांनी बोलायला सांगितलंय का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. या घटनेसंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन केला परंतु ते दोन दिवस झाले राज्यात नाहीत त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना फोन केला तर त्यांचा फोन लागला नाही. ते मुंबईत असल्याचं समजलं. त्यामुळे या त्या अधिकाऱ्यांना भेटण्यापेक्षा थेट गृहमंत्र्यांनाच भेटावं असं माझं मत आहे”. असं अजित पवार म्हणाले आहेत.

मृत घोषित झालेला तरूण तब्बल सहा महिन्यांनी घरी परतला अन् कुटुंबीयांनी तोपर्यंत…

“या प्रकरणामागे कोण मास्टरमाइंड आहे, त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजे. धमकी देणाऱ्या वर कडक‌ कारवाई झाली पाहिजे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाबद्दल गंभीर दखल घेतली पाहिजे. हल्ली धमकी देण्याची प्रकरण खूप वाढले आहेत. त्याचा मी निषेध करतो”. असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

“कोणत्याही नेत्याला धमकी येणं…”, शरद पवारांच्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *