रात्रीची वेळ होती तरुणी दोन मित्रांसोबत पडीक इमारतीत पार्टी करायला गेली अन्.. त्या ठिकाणी घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल

It was night time, a young woman went to a party in an abandoned building with two friends, and a terrible thing happened there; Reading it will give you goosebumps

A young woman died after falling from the seventh floor : आजकालची तरुण मुलं पार्ट्या करण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशन्सला आपला जीव धोक्यात घालून जातात. ती कधी उंच डोंगरांवरती जातात तर कधी ती नको त्या ठिकाणी जातात. मात्र अशा काही पार्ट्यांमुळे बऱ्याचदा जीव देखील गमवावा लागतो. सध्या मुंबईमध्ये (Mumbai) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

खळबळजनक! शरद पवारांनंतर आता संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी

मुंबईमध्ये एक तरुणी तिच्या दोन मित्रांबरोबर पडीक इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती आणि तीच पार्टी तिची शेवटची पार्टी ठरली. त्या तरुणीला अंधार असल्यामुळे पुढचा अंदाज आला नाही आणि तिचा तोल गेला व ती सातव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

“कोणत्याही नेत्याला धमकी येणं…”, शरद पवारांच्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

पोलिसांनी या प्रकरणाबाबत तिच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. व त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्या दोन तरुणांपैकी एक तरुण त्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे तर दुसरा तरुण तिचा जस्ट फ्रेंड आहे. खरंच ती तरुणी तोल जाऊन पडली का तिला पाडले गेले याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

“पवार साहेबांना काही झालं तर… “, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी येताच सुप्रिया सुळेंचा गंभीर इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *