हुंडा (Dowry) मिळवण्यासाठी लोकं कोणतीही हद्द पार करतात. कधी सुणांना जाळण्याचा प्रकार घडतो. तर, कधी विहिरीत ढकलून देण्याचा प्रकार घडतो. परंतु उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हुंड्यासाठी इतक्या खालच्या पातळीवरचा अमानुष प्रकार घडला आहे की जो वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. चक्क नवऱ्याने बायकोचे हुंडा दिला नाही म्हणून अश्लील फोटो व्हायरल केले आहेत. ते सर्व त्या मुलीच्या वडिलांना समजताच त्यांना हार्ट अटॅक आला आहे.
खेळ बेतला जीवावर! झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये (Bareilly) ही धक्कादायक घटना घडली आहे. त्या पतीने पत्नीच्या घरी हुंड्यात लक्झरी कार मागितली होती. परंतु, त्याची ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्याने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केले आहेत. हा सर्व प्रकार त्या मुलीच्या वडिलांना समजताच त्यांना झटका बसून त्यांचा मृत्यू झाला आहे.
मीरा रोड हत्याप्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने…
या प्रकरणाबाबत पोलिसांनी त्या महिलेच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करत अटक केले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा विवाह नक्श बंदियान नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. त्यांच्या लग्नात तिच्या वडिलांनी जवळजवळ 30 लाख रुपये खर्च केले होते. तरी देखील या लोकांना हुंड्याची आशा होती. त्या महिलेचा सतत छळ देखील चालू होता. त्यातूनच हा सर्व प्रकार घडला आहे.