Crime । इंस्टाग्राम Reels मुळे संसार उध्वस्त, रील्स बनवण्यापासून रोखल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा

Crime

Crime । सध्या अनेकजण मोबाईल वापरत असून यामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामचा वापर तर सर्वाधिक जास्त प्रमाणात केला जातो. सध्या अनेकजण इंस्टाग्रामवर रिल्स बनवून फेम मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या रिल्सचा खासगी आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. मोबाईल आणि रिल्सच्या नादात हसते खेळते संसार उध्वस्त झाल्याचे प्रकरणे आपल्यासमोर येतात. सध्या देखील असंच एक प्रकरण समोर आला आहे.

Sharad Mohal । शरद मोहळचा खात्मा करणारा मुन्ना पोळेकर नेमका कोण? जाणून घ्या

बिहार येथील बेगूसराय या ठिकाणाहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका पतीने पत्नीला रिल्स बनवण्यापासून रोखले मात्र पत्नीला ही गोष्ट आवडली नाही आणि तिने रागाच्या भरात पतीलाच संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच दहशत माजली आहे.

Covid JN.1 Cases । सर्वात धक्कादायक बातमी! पुण्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५९ रुग्ण, नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार

माहितीनुसार, इंस्टाग्रामवर आपल्या पत्नीने कोणत्याही प्रकारच्या रिल्स बनवू नये अशी पतीची इच्छा होती. तो तिला कायमच रिल्स बनवण्यास नकार द्यायचा. यावेळी नाराज झालेल्या पत्नीने तिच्या माहेरच्यांसह मिळून पतीची निर्घृण हत्या केली आहे. महेश्वर कुमार राय असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे तेथील गावात एकच खळबळ उडाली आहे.

Nitesh Rane । बिग ब्रेकिंग! भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट

महेश कुमार हा 7 जानेवारीला त्याच्या सासरी गेला होता. यावेळी पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी मिळून महेश कुमारचा गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी महेश कुमारच्या भावाने त्याला फोन केला असता तो फोन कोणीच उचलला नाही. यानंतर भावाला संशय आला आणि त्याच्या भावाने आणि वडिलांनी महेशची सासरवाडी गाठली. यावेळी त्यांना महेश कुमार मृतअवस्थेत दिसला आणि त्यांच्या पायाखालीची जमीनच सरकली.

Rashmika Mandanna । मोठी बातमी! सर्वांची आवडती अभिनेत्री रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात; साखरपुड्याची तारीख ठरली?

यानंतर महेशच्या कुटुंबीयांनी महेश कुमारची पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांवर आरोप केले आहेत. रिल्स बनवण्यापासून रोखल्यामुळे महेशच्या सासरच्याच लोकांनी हत्या केल्याचा आरोप महेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप!

Spread the love