Covid JN.1 Cases । सर्वात धक्कादायक बातमी! पुण्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५९ रुग्ण, नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार

Corona News

Covid JN.1 Cases । कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा मास्क लावावे लागणार का? त्याचबरोबर लॉकडाऊन देखील पुन्हा होणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. (Covid JN.1 Variant Cases in Pune)

Nitesh Rane । बिग ब्रेकिंग! भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट

आरोग्य मंत्रालयाची कालची म्हणजेच सोमवारची आकडेवारी देखील चिंता वाढवणारी आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी पुण्यात जेएन.१ चे तब्बल ५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० इतकी झाली आहे.

Rashmika Mandanna । मोठी बातमी! सर्वांची आवडती अभिनेत्री रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात; साखरपुड्याची तारीख ठरली?

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, राज्यात आढळून आलेल्या २५० रुग्णांमधील १५० रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. पुण्यात जेएन.१ व्हेरिएंटचा वाढता प्रसार पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असा सल्ला देखील आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप!

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पाहा ?

नागपूर ३०
मुंबई २२
सोलापूर ९
सांगली ७
ठाणे ७
जळगाव ४
अहमदनगर ३
बीड ३
छत्रपती संभाजीनगर २
कोल्हापूर २
नांदेड २
नाशिक २
धाराशिव २
अकोला १
रत्नागिरी १
सातारा १
सिंधुदुर्ग १
यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.

Viral video । संतापलेल्या म्हताऱ्याने थेट तरुणाला घातली गोळी, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Spread the love