Nitesh Rane । बिग ब्रेकिंग! भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट

Nitesh Rane Meet Sharad Mohal Family

Nitesh Rane । शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्येनंतर राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. शरद मोहोळ याची पत्नी भाजपमध्ये असल्याने विरोधकांकडून भाजपवर (BJP) टीका केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आला आहे. (Pune Crime )

Rashmika Mandanna । मोठी बातमी! सर्वांची आवडती अभिनेत्री रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात; साखरपुड्याची तारीख ठरली?

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली असून नितेश राणे यांनी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांचे सांत्वन केले आहे. त्यानंतर बोलताना नितेश राणे म्हणाले, “मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केले आहे. सामान्यांच्या अडचणी कायमच सोडवल्या आहेत. या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे काम आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप!

त्याचबरोबर शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांनी मोहोळ यांच्या विषयी कोणतीही चुकीची माहिती छापू नये असे आवाहन देखील यावेळी नितेश राणे यांनी केले आहे. (Nitesh Rane Meet Sharad Mohal Family)

Viral video । संतापलेल्या म्हताऱ्याने थेट तरुणाला घातली गोळी, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Spread the love