Crime News । धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करून नदीच्या वाळूत पुरला मृतदेह

Crime News

Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. (Crime) हे प्रकरण इथवरच थांबले नाही. याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्या महिलेचा मृतदेह नदीपात्रातील वाळूमध्ये बुजण्याचा प्रयत्न केला जात होता. पण पोलिसांनी मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. (Latest marathi news)

Rashmi Barve । लोकसभा निवडणुकीपूर्वी न्यायालयाचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील मायाबाई संजय मोरे (वय ३५, वर्षे) ही महिला आपल्या मुलासह २ मार्चला रात्री दहाला झोपली होती. मायाबाईंच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केले होते, त्यामुळे त्यांचे पती त्याच ठिकाणी होते. ३ मार्चला पहाटे चारच्या सुमारास मायाबाईंचा मुलगा गौरवला जाग आली असता त्याला आई दिसली नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या काकाला याबाबत माहिती दिली.

Navneet Rana । नवनीत राणांचे भवितव्य धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर आज होणार सुनावणी

मायाबाईंचा शोध सुरू केला असता वरखेडे खुर्द शिवारात मक्याचे ताटे ठिकठिकाणी तुटलेले सापडले. तिथेच रक्त देखील सांडलेले दिसले. त्या जागेवरच काचेच्या तुटलेल्या बांगड्या सापडल्याने घातपात झाल्याचा कुटुंबीयांना संशय आला. काहीजणांनी गिरणा नदीकडे शोध घेतला असता तिथे मायाबाईंचा अर्धवट बुजलेला मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढला असता मायाबाईंच्या डोक्यावर, दोन्ही कानांजवळ, छातीवर मांडीवर धारदार हत्याराने वार केल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

Supreme Court । ‘आदेशाची पायमल्ली केल्यास…’, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला इशारा

Spread the love