Navneet Rana । नवनीत राणांचे भवितव्य धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर आज होणार सुनावणी

Navneet Rana

Navneet Rana । राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज महत्त्वाचा निकाल देणार आहे. (Latest marathi news)

Supreme Court । ‘आदेशाची पायमल्ली केल्यास…’, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला इशारा

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपकडून (BJP) नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. “मागील १२ ते १३ वर्षापासून मी संघर्ष करत आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मला निकाल समजेल. महिलांच्या मागे हातात संघर्ष असतो,” अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

Congress । बिग ब्रेकिंग! लोकसभेअगोदरच काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या प्रवक्त्याने दिला राजीनामा

नवनीत राणा यांचं मुंबई उच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र बोगस ठरवण्यात आलं होतं. २०१९ उमेदवारी अर्ज भरताना बनावच जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर केला होता. नवनीत राणा यांच्या सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar । सख्खा भाऊ नाही तर शरद पवारांचे ‘हे’ नातेवाइक देणार अजितदादांची साथ

Spread the love