Supreme Court । गेल्यावर्षी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सर्वात मोठे बंड केले. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना सर्वात मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील अजित पवार यांना मिळाले आहे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला इशारा दिला आहे. (Latest marathi news)
Congress । बिग ब्रेकिंग! लोकसभेअगोदरच काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या प्रवक्त्याने दिला राजीनामा
घड्याळ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आगेशाची पायमल्ली केली तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं घड्याळ या पक्षचिन्हाबाबत निकाल सुनावण्यापूर्वी पक्षचिन्हं न्यायप्रविष्ठ असल्याची जाहिरात अजित पवार गटानं मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करून निवडणुकीशी संबंधित प्रचार पत्रक, संदेश आणि इतर प्रचारविषयक संदर्भांसह चित्रफितींमध्ये न्यायप्रविष्टचा उल्लेख करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
Ajit Pawar । सख्खा भाऊ नाही तर शरद पवारांचे ‘हे’ नातेवाइक देणार अजितदादांची साथ
पण अजूनही अजित पवार गटाने आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे आता न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर अजित पवार गटाकडून आतापर्यंत किती जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात नेमका कोणता मजकूर होता अशी माहिती सादर करण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिले आहेत.