वेळ आली होती पण काळ नाही! भर पावसात असे वाचले तिचे प्राण… पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Rain

अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागात वादळासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) राज्यात आणखी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. सर्वत्र पाऊस पडत असल्याने पावसाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. यातील काही व्हिडिओ धक्कादायक असतात, तर काही व्हिडिओ गमतीशीर असतात. (Latest Marathi News,)

फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर! Realme 11 Pro+ फोनवर मिळतोय 26,700 रुपयांचा डिस्काउंट

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आलाच समजा. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक मुलगी रस्त्यावरून स्कुटर चालवत असते. अचानक तिच्यासमोर एक झाड कोसळते. ती त्या झाडापासून अवघ्या ५ ते ६ सेकंदाच्या अंतरावर असते. नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. नाहीतर मोठा अनर्थ झाला असता.

काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! सहा वर्षांसाठी १८ नगरसेवक अपात्र

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह शेअर केला आहे. या व्हिडिओला ‘बच गई बेचारी’ असे कॅप्शन दिले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 48 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. तसेच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘उबाठा’चा आणखी, एक मोहरा होणार कमी’, शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *