महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाला मात्र आता सगळीकडे मान्सूनने जोर धरला आहे. राज्यातील सर्व भाग मान्सूनने व्यापला आहे. मागच्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान देखील झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. दरम्यान, मान्सूनचा पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. (Rain Update)
वेळ आली होती पण काळ नाही! भर पावसात असे वाचले तिचे प्राण… पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड,कोकण, राजस्थान, गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील घाट क्षेत्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. (Latest news)
फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर! Realme 11 Pro+ फोनवर मिळतोय 26,700 रुपयांचा डिस्काउंट
मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जास्त धोका असलेल्या पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. (Heavy Rain)
काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! सहा वर्षांसाठी १८ नगरसेवक अपात्र