
Mumbai Crime । मुंबई : कितीही कायदे कडक केले तरीही वाढत्या गुन्हेगारीला (Crime) आळा बसला नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे यात अल्पवयीन आरोपींचाही (Juvenile accused) समावेश होऊ लागला आहे. ‘मुले देवाघरची फुले’ असे म्हटले जाते. परंतु अलीकडच्या काळात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. ही मुले वेळेपूर्वीच मोठी होऊ लागली आहेत. एक धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. ज्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. (Crime News)
Ravindra Waikar । ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार विरार येथे घडला आहे. 15 वर्षांच्या एका मुलीने तिच्या 12 वर्षांच्या मैत्रिणीला घरी बोलावले. डॉक्टर-डॉक्टर खेळू असे सांगत त्या मुलीला बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवले. हे प्रकरण इथेच थांबले नाही. त्या मुलीने 17 वर्षाच्या मुलाला बेडरूममध्ये बोलावले. त्यानंतर त्या मुलीने दरवाजा बाहेरून घट्ट बंद केला. त्या पीडित मुलीने मदतीसाठी हाक मारली परंतु आरोपीने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. (Physically abused)
Supriya Sule । वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे यांनी सांगितली आठवण
त्यानंतर त्या आरोपीने या मुलीला या प्रकाराची कोठे वाच्यता केली तर तुझ्या लहान बहिणीसोबत असेच करेन, अशी धमकी दिली. भीतीपोटी त्या पीडितेने कोणालाच याबाबत कल्पना दिली नाही. परंतु काही दिवसानंतर ती गरोदर राहिल्याने तिच्या आईला हा प्रकार समजला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.