Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! आज शरद पवार जालन्यातील जखमी आंदोलकांची घेणार भेट

Today Sharad Pawar will meet the injured movement in Jalanya

Sharad Pawar । जालना जिल्ह्यामध्ये अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठी चार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांचा तीव्र निषेध केला जात आहे. पोलिसांनी लाठी चार्ज केल्यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार देखील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णानं भेट देऊन ते जखमींची विचारपूस देखील करणार आहेत.

शरद पवार यांचा दौरा कसा असेल?

आज सकाळी साडेअकरा वाजता शरद पवार छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर साडे बारा वाजता अंबडं रुग्णालयात दाखल होऊन त्या ठिकाणी जखमींना भेट देतील. त्यानंतर ते आंदोलन सुरू असलेल्या अंतरवलीस सराटी या गावाला भेट देणार आहेत आणि नंतर शेवटी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

29 ऑगस्ट पासून जालन्यातील अंतरवली सराटमध्ये मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहाजण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्याचबरोबर त्यांच्या समर्थनार्थ काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी उपोषण करताना आंदोलकांची प्रकृती खालवण्याची भीती झाली होती त्यामुळे या उपोषणात जास्त गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी विरोध केला त्यानंतर पोलिस आणि आंदोलकी यांच्यामध्ये बाचाबाची झाली असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यावेळी आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला आहे.

राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जालन्या मधील आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याचा राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारने समाजाचा अंत पाहू नये असा इशारा देखील विरोधी पक्षांनी दिला आहे. त्याचबरोबर जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Spread the love