
Jalna lathi charge । जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे. आंदोलनकर्त्यांकडून सरकार (Government) आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. जालना औरंगाबाद रोडवर नागेवाडी आणि दावलवाडी ठिकाणी मराठा युवक आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको केल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. (Maratha reservation Jalna lathi charge)
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! आज शरद पवार जालन्यातील जखमी आंदोलकांची घेणार भेट
अशातच जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आज मराठा क्रांती मोर्चाची (Maratha kranti morcha) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा समन्वयकांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब केला जाईल. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
Agri News । शेतकऱ्यांनो.. करा ‘या’ पिकची लागवड, अवघ्या 5 ते 6 महिन्यातच व्हाल लखपती
आज बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जालना घटनेच्या निषेधार्थ बीड बंदची हाक दिली आहे. धाराशिव जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. शिवाय आज नंदुरबारमध्येही बंद पुकारण्यात आला होता. परंतु, अचानक पुकारलेल्या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय मागे घेतला आहे. परंतु महामंडळाच्या एसटी बसेस १०० टक्के बंद असतील.
Agri News । शेतकरी बंधूंनो, शेडनेट उभारून मिळवा 3 लाख 55 हजारांचे अनुदान, असा घ्या लाभ
तसेच सोलापुरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून खूप मोठी चूक केली आहे, त्याचे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील दिला आहे.
Onion Price । कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! दरात होणार विक्रमी वाढ