Palghar Crime । माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या चिमुरडीचा आईने घेतला जीव, धक्कादायक कारण समोर

The mother took the life of a five-day-old girl, the shocking reason is revealed

Palghar Crime । पालघर : आपले लेकरू कसे का असेना प्रत्येक आई (Mother) त्याला जीवापाड प्रेम करते. इतर नात्यापेक्षा आईच्या नात्याला जगात सर्वोच्च मान दिला जातो. अडचणीत आपण एकटे आहोत याची आई आपल्याला कधीच उणीव भासू देत नाही. त्यामुळे आईचे महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. अशातच आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या चिमुरडीची आईने हत्या (Crime) केली आहे. (Latest Marathi News)

Devastating floods । धक्कादायक! धरण फुटल्याने शहर उद्ध्वस्त, 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती

पालघरमधील तारापूरमध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे. श्रेया प्रभू (वय 32 वर्ष) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. परंतु तिसऱ्या वेळेस तिला आपल्याला मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तिला मुलगीच झाली. त्यामुळे रागाच्या भरात त्या महिलेने पाच दिवसाच्या चिमुकलीचा गळा दाबून तिला ठार मारले. हे प्रकरण इथवरच थांबले नाही. (Crime News)

Eknath Shinde । आमचं सरकार फक्त घोषणा नाही करत तर अंमलबजावणी करते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्या महिलेने याबाबत कोणाला माहिती होऊ नये म्हणून चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकून दिला. आशा सेविका बाळाच्या तपासणीसाठी त्या महिलेच्या घरी गेली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. आशा सेविकेने शेजारी चौकशी केली असता शेजाऱ्यांनी ती बाळासोबत गेली मात्र एकटीच माघारी आली असे सांगितले. तारापूर पोलिसांनी या महिलेला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

Pune Crime । प्रेमानेच केला घात! प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीने केले असे काही की…वाचून बसेल धक्का

Spread the love