Devastating floods । धक्कादायक! धरण फुटल्याने शहर उद्ध्वस्त, 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती

Devastating floods

Devastating floods । संपूर्ण जगाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. धरण फुटल्याने निम्मे शहर उद्ध्वस्त झाले आहे. या दुर्घटनेत तब्बल 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये जनावरे, माणसे वाहून गेली आहेत. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले आहे. पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Eknath Shinde । आमचं सरकार फक्त घोषणा नाही करत तर अंमलबजावणी करते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अशी धक्कादायक घटना लीबियात घडली आहे. लीबियातील डर्ना शहरातील धरण फुटले आहे. त्यामुळे या शहरात महापूर आला आहे. हे पाणी संपूर्ण शहरात शिरले आहे. त्यामुळे माणसे, जनावरे, वाहने वाहून गेली आहेत. आतापर्यंत 40 हजार लोक दगावले असून 10 हजार लोक बेपत्ता झाले आहेत तर 30 हजार लोकांचं पुनर्वसन केले जात आहे.

Pune Crime । प्रेमानेच केला घात! प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीने केले असे काही की…वाचून बसेल धक्का

या शहरात दोन धरणे आहेत. या धरणाखाली डर्ना शहर वसवण्यात आले होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मागील 20 वर्षांपासून या धरणांची देखभाल केली नव्हती. परंतु डॅनियल वादळामुळे हे धरण फुटले. प्रशासनाच्या एका चुकीमुळे या शहरावर असे संकट आले आहे. या घटनेतून प्रशासन आता तरी धडा घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली; दोन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

Spread the love