लग्न झालेले असताना एका व्यक्तीला विवाहबाह्य संबंध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या बायकोने त्याला रंगेहाथ पकडून भावांच्या मदतीने चांगला चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात.
मिळालेली माहिती अशी की, त्या महिलेचा पती इंजिनियर आहे. तिला आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती. तो सरकारी निवासस्थानी मैत्रिणीची पार्टी करत होता. याची माहिती मिळताच ती आपल्या दोन भावांसोबत त्या ठिकाणी आली. पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिचा रागाचा पारा वाढला. तिथेच त्या दोघांचे भांडण झाले. तिच्या दोन भावांनी त्याला बेदाम मारहाण केली.
Ajit Pawar | “…त्यासाठी अजितदादांनी आमच्यासोबत यावं”, शिंदे गटातील बड्या नेत्याची ऑफर
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेचे दोन भाऊ मेहुण्याला मारहाण करत आहेत. तसेच महिला देखील पतीच्या मैत्रिणीला मारहाण करताना दिसत आहे.
Mira Road Murder | मृत्यूनंतर तिचे न्यूड फोटो काढले अन्…, आरोपी मनोजचा खुलासा वाचून बसेल धक्का
या सर्व घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी लगेच दाखल झाले. त्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यावेळी त्या पतीने आपण पुन्हा असे करणार नसल्याची कबुली दिली. तसेच पत्नीनेही या मैत्रिणीला न भेटण्याची अट ठेवली.