Shocking News । सध्या थंडीचे दिवस (Cold days) सुरु आहेत. सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढू शकतो. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पण ही शेकोटीच काळ ठरली आहे. एका कुटुंबाने उब मिळण्यासाठी चूल पेटवली आणि क्षणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi news)
Pankaja Munde । पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार 25 जानेवारीला ई-लिलाव
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा (Uttar Pradesh Amroha) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या जिल्ह्यातील अल्लीपूर भुड गावात रईसुद्दीन शेख आपल्या परिवारासह राहतात. कडाक्याची थंडी पडली असल्याने त्यांनी घरात चूल पेटवली आणि रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय झोपण्यासाठी गेले. या चुलीतून मोठ्या प्रमाणावर धुर निघत होता.
त्यामुळे संपूर्ण घर धुराने भरून गेले. घरातून अचानक जास्त धूर निघत असल्याने गावकऱ्यांनी शेख यांच्या घराकडे तातडीने धाव घेतली. दरवाजा ठोठावला पण आतून कोणतीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी दरवाजा तोडला आणि समोरच्या दृश्याने ते हादरून गेले. धुरामुळे ७ जण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ५ जणांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.