Pankaja Munde । पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार 25 जानेवारीला ई-लिलाव

Pankaja Munde

Pankaja Munde । बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने (Central GST Commissionerate) काही महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. त्यात या कारखान्याने तब्बल 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर (GST Tax) बुडवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest marathi News)

या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत कर्ज आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या (Vaidyanath Cooperative Factories) लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर करण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव (Vaidyanath Cooperative Factory Auction) होईल, अशी माहिती मिळाली आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी खूप मोठा धक्का समजला जात आहे.

दरम्यान, जीएसटी विभागाने थकीत नोटीस दाखवताच लोकसहभाग आणि लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी केली होती. पण पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता. अखेर या कारखान्याचा 25 जानेवारीला ई-लिलाव होणार आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष पंकजा मुंडे या आहेत.

Spread the love