बऱ्याचदा मुलींचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले जाते. ज्या मुलासोबत त्यांचे प्रेम आहे त्या मुलांसोबत मुलीच्या घरचे तिचे लग्न (marriage) लावून देत नाहीत. त्यामुळे मुली पळून जाण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. बऱ्याचदा मुली भर लग्नमंडपातून देखील पळून जातात. अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील. सध्या देखील उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा येथून मुलगी लग्न मंडपातून प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेमासाठी काहीपण! मुस्लिम मुलीने केलं धक्कादायक कृत्य; म्हणाली, “न्यायाधीश साहेब…”
उत्तरप्रदेशातील बांदा या ठिकाणी लग्नाची सर्व तयारी झाली होती मात्र नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मुलगी पळून गेल्यांनतर संपूर्ण नातेवाईकांना याबाबत माहिती झाली. नातेवाईकांमध्ये वेगेवेगळ्या चर्चा देखील होऊ लागल्या. याबाबत नवरी मुलीच्या वडिलांना माहिती समजताच त्यांना धक्काच बसला. मात्र त्यांनी खचून न जाता यातून पर्याय शोधला.
पावसाबाबत मोठी अपडेट! लवकरच महाराष्ट्रात होणार पावसाचे आगमन; पाहा काय सांगतायत हवामान तज्ञ?
नवरी मुलीच्या वडिलांनी नवरीची लहान बहीण म्हणजेच त्यांची छोटी मुलगी हिचे लग्न संबंधित वरासोबत लावून देण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोघांचे लग्न त्याच लग्नमंडपात लावून दिले. त्याचबरोबर मुलीच्या वडिलांनी मुलीच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण तींदवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील आहे.