उन्हाळ्याची सुट्टी लागल्या की लहान मुलांच खेळण्याकडे जास्त लक्ष असतं. मात्र यावेळी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. अलीकडच्या काळात लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. हे मृत्यू अगदी शुल्लक कारणांवरून होत आहे. नुकतीच बहदला गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, झोका खेळत असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून मुलीला फास लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. मनीषा कुमारी असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. झोका खेळत असताना अचानक दोरी गळ्यात अडकल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे.
झोक्याची दोरी मानेला अडकल्यामुळे मनीषा ती काढू शकली नाही. तसेच यावेळी तिला कोणीही पाहिले नाही. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. मनीषाला फास लागल्याचे समजतात कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मनीषाला उना येथील प्रादेशिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत मनीषाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आई-वडिलांचा शोक पाहून संपूर्ण परिसरातील लोकांचे डोळे पाणावले आहेत.
Ajit Pawar। नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले, “आता स्टॅम्प पेपरवर लिहून…”
या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. पण उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा इतर कोणताही सुट्टीचा दिवस असो पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे फार गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या वेळी दुर्लक्ष झाल्यास मोठे संकट कोसळू शकते.
ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अपघात की घातपात? समोर आली धक्कादायक माहिती