Crime News । संतापजनक! बायको माहेरी जाताच बापाने केली ३ वर्षांच्या चिमुरड्याची विक्री

Crime News

Crime News । यवतमाळ : हल्ली गुन्ह्यांमध्ये (Crime) वाढ होत चालली आहे. वाढती गुन्हेगारी रोखणे हे प्रशासनापुढचे मोठे आव्हान बनले आहे. कायदे (Crime Law) कठोर करूनही गुन्हेगारांना त्याचा धाक राहिला नाही. क्षुल्लक कारणावरून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशीच एक माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

Sharad Mohol । शरद मोहोळ याचे भाजपशी कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर

यवतमाळ (Yavatmal Crime News) जिल्ह्यातील कोपरा गावात चक्क बापाने ३ वर्षांच्या चिमुरड्याची विक्री केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला आहे आणि तेलंगणा येथून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या पित्याने धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. (Yavatmal Crime)

Sharad Mohal । मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणाचं धक्कादायक कारण समोर; पोलीसही चक्रावले

पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने फिर्यादी महिला ३ दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. गुरुवारी महिला परत पतीच्या घरी आली तेव्हा तिला आपले बाळ दिसले नाही. दिवसभर तिने आपल्या बाळाचा शोध घेतला. त्यानंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी संशयितांपैकी काहींना अटक केली. पोलिसांनी धाक दाखवताच आरोपींनी बाळाचा पत्ता सांगितला. माहितीवरून पोलिसांनी तातडीने तेलंगणातील निर्मल गाव गाठून बाळाची सुटका केली.

Sunil Kamble । मोठी बातमी! भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावणे भोवलं

Spread the love