WTC 2025 । भारतीय संघाला मोठा झटका! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल

WTC 2025

WTC 2025 । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं (World Test Championship) संपूर्ण सर्कल पूर्ण होण्यास एकूण दोन वर्षांचा अवधी लागतो. यापैकी सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. भारतासाठी (Team India) 2024 वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण या वर्षात कसोटीतील प्रत्येक जय पराजय अंतिम फेरीचं गणित ठरवले जाईल. अशातच आता भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. (Latest marathi news)

Christian Oliver Dies । सिनेसृष्टीवर मोठी शोककळा! विमान अपघातात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह मृत्यू

भारताचं पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विजयाने हिरावून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 3-0 पराभूत केल्याचा ऑस्ट्रेलियाला खूप फायदा झाला आहे. ( World Test Championship 2025) या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. याचा फटका भारताला बसला आहे.

Crime News । संतापजनक! बायको माहेरी जाताच बापाने केली ३ वर्षांच्या चिमुरड्याची विक्री

त्यामुळे आता भारताला गुणतालिकेत पहिला नंबर मिळावायचा असल्यास इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताला आपली टक्केवारी सुधारावी लागणार आहे. दरम्यान, भारतीय संघाला देखील इंग्लंडप्रमाणे स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. संघाचे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन गुण कापण्यात आले होते. आता क्रिकेटप्रेमींची नजर भारत-इंग्लंड आणि न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका मालिकेवर आहे.

Sharad Mohol । शरद मोहोळ याचे भाजपशी कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर

Spread the love