Sharad Mohol । शरद मोहोळ याचे भाजपशी कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर

Sharad Mohol

Sharad Mohol । पुण्यामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळ याचा खून करण्यात आला आहे. गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे.

Sharad Mohal । मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणाचं धक्कादायक कारण समोर; पोलीसही चक्रावले

शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जवळपास आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीस याचा तपास करत आहेत. शरद मोहोळ याच भाजप कनेक्शन असल्याच्या देखील चर्चा सध्या रंगल्या आहेत. (Sharad Mohol Case Update)

Sunil Kamble । मोठी बातमी! भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावणे भोवलं

माहितीनुसार, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यावेळी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ होते. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्याचबरोबर शरद मोहळच्या पत्नीने भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यावर अनेकांनी जोरदार टीका देखील केली होती.

Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळ टोळीचे वर्चस्व असून याचा फायदा भाजपला निवडणुकीमध्ये होणार होता. मात्र गुंडाला भाजपमध्ये घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. मात्र निवडणुकाआधीच शरद मोहोळ याचा नेमका गेम कोणी केला? हा खून टोळी युद्धातून झाला की दुसऱ्या व्यक्तीने केला. याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे.

Uddhav Thackeray Group । उद्धव ठाकरे यांना बीडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 35 सरपंच करणार शिंदे गटात प्रवेश

Spread the love