
अनेक जोडपे लग्नानंतर (Marriage) वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जात असते. त्यामुळे पर्यटनस्थळांवर (Tourist places) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु, अनेकदा याच पर्यटनस्थळांवर अनर्थ घडतात. असे असल्याने फिरायला येणाऱ्या जोडप्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते. लग्नानंतर हनीमूनसाठी (Honeymoon) फिरायला गेलेल्या एका जोडप्यासोबत एक वेगळा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! साखरेचे दर वाढणार की कमी होणार? निर्यातीवर बंधने येण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील एक जोडपे जयपूरला फिरायला गेले होते. फिरून झाल्यानंतर या जोडप्याने काही वेळ हॉटेलमध्ये आराम केला. आमेर किल्ला पाहिल्यानंतर त्यांनी सीकर येथील रिंगस स्थित बाबा खाटूश्याम जी मंदिरामध्ये जाण्यासाठी प्लॅन केला होता. त्यानंतर नवरा मुलगा गाडी बुक करण्यासाठी गेला होता. परंतु माघारी येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
सरकारची मोठी घोषणा! वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 25 लाखांची मदत
कारण त्याची पत्नी त्याला हॉटेलमध्ये दिसली नाही. बराच वेळ त्याने पत्नीचा शोध घेतल्यानंतर त्याने हॉटलेमधील CCTV फूटेज पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. कारण ती नववधून मोबाईल वर बोलत बोलत हॉटलेमधून पळून जाताना दिसली. त्यानंतर त्याने झोटवाडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Sharad Pawar । भाजपसोबत जाणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, “आगामी निवडणुका ..”
परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यामध्ये काही वाद झाले होते. या वादामुळे पत्नी नाराज झाली होती. त्यामुळे पती कॅब बूक करण्यासाठी खाली गेला असता नाराज झालेल्या पत्नीने लगेचच हॉटेलमधून जाण्याचा निर्णय घेतला.
Ghagarkond Falls । फिरायला जाणे बेतले जीवावर! रायगड मधील प्रसिद्ध धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू