Sharad Pawar । भाजपसोबत जाणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, “आगामी निवडणुका ..”

Will you go with BJP? Sharad Pawar clearly said, "Upcoming elections.."

Sharad Pawar । मागील काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विरोधात बसणारे अचानक सत्तेत सहभागी होत असल्याने सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आणखी एक मोठा गट फुटणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

Ghagarkond Falls । फिरायला जाणे बेतले जीवावर! रायगड मधील प्रसिद्ध धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

मागील आठवड्यात पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी आपण शहांना भेटलो नसल्याचे स्पष्ट केले.

Ravikant Tupkar । राजकीय घडामोडींना वेग! रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार की इतर पक्षात जाणार?

माध्यमांशी बोलताना भाजपसोबत (BJP) जाण्याबाबत शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. ” काहीही झालं तरी आपण पुन्हा सगळं उभा करू. आपण कोणतीही तडजोड करणार नाही, कारण आपल्याला भाजप विरोधातच लढायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत मी भाजपसोबत जाणार नाही. त्यामुळे मनात शंका न आणता आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा”, असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

Seema Haider । सीमा हैदर लवकरच तुरुंगात जाणार? पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत; समोर आली धक्कादायक माहिती

Spread the love