Talathi Bharti । मुंबई : यावर्षी तलाठी (Talathi) पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी एकूण १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यावर्षी TCS च्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर (Talathi Exam) फुटल्याची सर्वत्र चर्चा आहे. तसेच सर्व्हरमध्येदेखील बिघाड झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)
पेपर फुटी प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तलाठी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे. अशातच आता या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.
Crime News । भयानक! आधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायची, त्यानंतर स्वतःच तक्रार करुन पुरुषांना लुटायची
तलाठी पेपर फुटीसंदर्भात कडक कायदे करणार असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. आश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या जाणार का? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान तलाठी भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केलेला गणेश घुशिंगे म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारातही संशयित आरोपी आहे. तो म्हाडा परीक्षेच्या निवड यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला होता.
Crime News । धक्कादायक! जमलेलं लग्न मोडलं, मग तरुणानं घेतला टोकाचा निर्णय