मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. यानंतर आरोपीनी मृतदेह कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. (Mumbai Mira Road Massacre)
या घटनेबाबत मनोजने देखील मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, मला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे आमची सतत भांडण होत होती त्यामुळे तिने ४ जूनला विष घेतलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्यालाच दोषी धरलं जाईल या भीतीने मी सर्व लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती आरोपीनंच पोलिसांना दिली आहे.
बापरे! उर्फी जावेदला पाहताच लोकं घाबरली अन् थेट पळायला लागली; पाहा व्हिडिओ
त्याचबरोबर आरोपीने अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने प्रभावित होऊन आपण सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. मात्र पोलिसांना त्याच्या या थिअरीवर देखील विश्वास नाहीये. त्याचबरोबर सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करून परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याचं देखील आरोपीने सांगितलं आहे. मात्र पोलिसांना या थिअरीवर देखील विश्वास नाहीये.
गौतमी पाटीलचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “तू तर खूपच…”
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एवढं क्रूर हत्याकांड करून देखील आरोपीच्या चेहऱ्यावर पच्छाताप असल्याचं जाणून येत नाही. सध्या त्याला ८ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्याची चौकशी देखील चालू आहे.
भाजपाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका