Ajit Pawar | काल (21 जुन) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या मनातील अनेक इच्छा बोलून दाखवल्या आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेते पद नको असल्याचं देखील यावेळी बोलून दाखवलं आहे. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
“नुसतीच दाढी कुरवाळत बसू नका. थोडं काम देखील करा. ज्यावेळी काम करताल त्यावेळीच मी तुमचं कौतुक करेल, असं अजित पवार म्हणाले. यानंतर त्यांच्या या विधानाच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या. आता अजित पवारांच्या या टीकेला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दादा भुसे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सध्या असे मुख्यमंत्री आहे जे दिवसाच्या 24 तासातून 20 तास काम करतात. एकनाथ शिंदे पहिले असे मुख्यमंत्री आहे, जे एवढा जास्त वेळ काम करतात” असं दादा भुसे म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “जर दाढी कुरवाळायचा विषय असेल. तर ज्याला दाढी असेल तर त्याच्या कुरवाळल्यानं कोणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही. कदाचित अजित पवार यांना दाढी नसल्यामुळे त्यांना तो फील येत नसेल.” असं दादा भुसे म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.
ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, मुंबई महापालिकेने केली मोठी कारवाई
हे ही पाहा