Highway Accident । पुणे : सततचे अपघात (Accident) पाहता देशात वाहतुकीसंदर्भातील नियम खूप कठोर केले आहेत. तरीही अपघाताचे सत्र काही थांबले नाही. काही वाहन चालकांकडून नजरचुकीने नियम मोडले जातात तर काही जाणूनबुजून नियम मोडतात. परंतु वाहनचालकांच्या एका चुकीमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. (Car-Truck Accident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) चित्रदुर्गजवळ काल सकाळी ७.१५ च्या सुमारास अपघात झाला आहे. मल्लापूर- गोल्लरट्टीजवळ एका कारची महार्गाच्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारच्या (Car Accident) समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघाताची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)
या अपघातामध्ये चौघेजण जागीच ठार झाले आहेत आणि तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. महामार्गावर ट्रक उभा असणारा लक्षात न आल्याने आणि कारचालकाचे नियंत्रण सुटून कार आदळली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.