Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! सरकारला 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय

An ultimatum to the government till 5 o'clock, Manoj Jarange Patil will take a big decision

Maratha Reservation । जालना : अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण रखडले आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाकडून बऱ्याच वेळा आंदोलन (Maratha Reservation Protest) करण्यात आले. परंतु अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले केल्याने सरकारविरोधात मराठा समाजात नाराजी पसरली आहे. अशातच आता शांततेत सुरु असणाऱ्या जालन्यातील (Jalana) लाठीहल्ल्याने हे आंदोलन पेटले आहे. (Jalana Protest)

Gautam Gambhir । विराट कोहलीच्या घोषणा ऐकताच गौतम गंभीरने केलं नको ते कृत्य, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. त्यावेळी प्रचंड गोंधळ झाल्याने राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. त्यांच्या आमरण उपोषणचा (Manoj Jarange Patil Protest) आज आठवा दिवस असून त्यांची त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अशातच आज ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Petrol Diesel Price । जाहीर झाले पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर, पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी झटपट जाणून घ्या

पाण्याचा करणार त्याग

राज्य सरकारने काल पत्रकार परिषद घेऊनही मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून त्यांची मनधरणी सुरु आहे. परंतु, त्यांनी सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून जर त्यांनी आज पाणी सोडले तर त्यांची प्रकृती बिघडू शकते.

Havaman Andaj । राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार! ‘या’ परिसरात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

मराठा समाजाचा अंत पाहू नका

“मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. न्याय देण्यासाठी एवढ्या विलंबाची काहीच गरज नाही. सरकारने तातडीने हा विषय मार्गी लावावा. चर्चेसाठी दार खुली आहेत. परंतु, नुसत्या चर्चा करुन अंत पाहू नका”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Gautami Patil । सर्वात मोठी बातमी! नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन

Spread the love