Gautam Gambhir । विराट कोहलीच्या घोषणा ऐकताच गौतम गंभीरने केलं नको ते कृत्य, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

On hearing Virat Kohli's announcements, Gautam Gambhir's inappropriate act, the video went viral on social media

Gautam Gambhir । भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. त्याला मैदानाबाहेरदेखील खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अनेकदा तो त्याच्या वादग्रस्त विधानामुळेही अडचणीत आल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर (Social media) त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. (Gautam Gambhir Viral Video)

Petrol Diesel Price । जाहीर झाले पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर, पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी झटपट जाणून घ्या

क्रिकेटर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli vs Gautam Gambhir) यांच्यातील वाद सर्वांना माहितीच आहेत. काल त्या वादात आणखी भर पडली आहे. काल भारतीय संघ विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी गौतम गंभीर हा स्टार स्पोर्टकडून कॉमेंट्री करत होता. परंतु, सामना सुरु असताना एक विचित्र घटना घडल्याचे पाहायला मिळाले. गंभीर मैदानातून कॉमेंट्री रूमकडे जात असताना प्रेक्षकांनी कोहलीचा (Virat Kohli) जयघोष सुरू केला.

Havaman Andaj । राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार! ‘या’ परिसरात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

त्यामुळे गंभीरला राग अनावर झाला. सुरुवातीला तो प्रेक्षकांकडे पाहतच राहिला आणि नंतर अश्लील हावभाव केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते आणि नेटकरी गंभीरच्या कृत्याचा निषेध करत आहेत. “गंभीर हा संघाचा माजी क्रिकेटर तसेच लोकसभा खासदार आहे. त्याला असं कृत्य करणं शोभा देत नाही”, यांसारख्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

Gautami Patil । सर्वात मोठी बातमी! नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन

पहा व्हायरल व्हिडिओ

गंभीरने दिले स्पष्टीकरण

व्हायरल व्हिडिओवरून गौतम गंभीरने स्पष्टीकरण दिले आहे. “काही जण स्टेडियममध्ये हे भारतविरोधी घोषणा देत होते. मी एक भारतीय असून माझ्या देशाबद्दल असे ऐकू शकत नाही. त्यामुळे मी तशी कृती केली. तुम्ही सोशल मीडियावर जे पाहता ते नेहमीच योग्यच असते असे नाही,” असे गंभीरने स्पष्ट केले आहे.

Maratha Reservation । मराठा आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जाणून घ्या

Spread the love