Cyclone Biparjoy : बिपरजॉय या चक्रीवादळाने गुजरातमध्ये चांगलेच थैमान घातले आहे. गुजरातमध्ये किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जनजीवन विस्कळीत झाले असल्याने या ठिकाणी NDRF ची एकुण 33 पथके तैनात केली आहेत.
बापरे! वडिलांनी दुसरं लग्न लावून दिलं म्हणून मुलीन थेट पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य
ताशी 145 किमी वेग या चक्रीवादळाचा होता, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने राजभर पावसाची शक्यता वर्तवली आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात येथील कच्छ, भुज, जामनगर द्वारका, बडोदा यासह अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. या राज्यासाठी पुढील काही तास आव्हानात्मक असल्याचे मत हवामान खात्याने सांगितले आहे.
सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग
वादळामुळ 22 जण जखमी झाले असून 23 जनावरांचा मृत्यु झाला आहे. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 524 झाडे पडल्याने 140 गावातील वीजपुरवठा खंडित केला आहे. सोशल मीडियावर या भयानक वादळाचा एक व्हिडिओ शेअर चांगलाच व्हायरल होत आहे. यात मोठमोठी झाडेही क्षणार्धात कोसळून पडत असल्याचे दिसुन येत आहे.
Pune । पुण्यात घटना धक्कादायक प्रकार, पीएमपीएमएल बस गेली चोरीला
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडुन किनारी भाग रिकामा करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे. त्याचबरोबर यापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
शरद पवार, गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण