BJP । भाजपला पुन्हा गळती! ४०० वाहनांच्या ताफ्यासह भाजपच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP leak again! A senior BJP leader entered Congress with a fleet of 400 vehicles

मागील काही दिवसांपासून आपल्याला अनेक दिग्गज नेते पक्षांतरण करताना दिसत आहे. अशातच भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे यांचे कट्टर समर्थक असणारे बैजनाथ यादव (Baijnath Yadav) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडणार आहेत. परंतु, निवडणुकापुर्वीच यादव यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला (BJP) चांगलाच धक्का बसला आहे.

Cyclone Biparjoy: भयानक! बिपरजॉय वादळाची धडकी भरवणारी दृश्य आली समोर, पाहा व्हिडिओ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, राष्ट्रीय महासचिव दिग्विजयसिंग आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्या उपस्थितीतीत त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार आणि मंत्री अंखड प्रताप सिंह (Pratap Singh) यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता या दोन बड्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे यांच्या राजीनाम्यामूळे भाजपला मोठा धक्का येत्या निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.

बापरे! वडिलांनी दुसरं लग्न लावून दिलं म्हणून मुलीन थेट पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेत्यांसोबत त्यांचे जमत नव्हते. त्यांनी मंगळवारी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ४०० वाहनांच्या ताफ्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Pune । पुण्यात घटना धक्कादायक प्रकार, पीएमपीएमएल बस गेली चोरीला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *