मागच्या काही दिवसापासून मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या (Violence in the state of Manipur) घटना घडत आहेत. दरम्यान काल देखील एक घटना घडली आहे. काल रात्री केंद्रीय मंत्र्याच्या घरावर जमावाने हल्ला केला. आरके रंजन सिंह (RK Ranjan Singh) यांच्या घराला जमावाने आग लावली. घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह घरी नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Pune । पुण्यात घटना धक्कादायक प्रकार, पीएमपीएमएल बस गेली चोरीला
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना आरके रंजन सिंह म्हणाले, “मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. कृतज्ञतेने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. तळमजला आणि पहिला मजला जळाला झाला आहे.”
बापरे! वडिलांनी दुसरं लग्न लावून दिलं म्हणून मुलीन थेट पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या गृहराज्यात जे काही घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. जे असा हिंसाचार करतात ते पूर्णपणे अमानवी आहेत.” असं ते म्हणाले आहेत.
शरद पवार, गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण
हे ही पाहा